जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज बाद होताच सुमित पाटील आक्रमक; थेट न्यायालयात जाणार!

---Advertisement---

 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपला अर्ज राजकीय दबावातून बाद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला असून, या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

अर्जावर घेण्यात आलेल्या हरकतींच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. तरीही आपला उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याचा दावा सुमित पाटील यांनी केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या व्यक्तींची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचे सुमित पाटील यांनी म्हटले आहे. तसेच अर्ज बाद करण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागून कायदेशीर लढा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या घडामोडींमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय वातावरण तापले असून, सुमित पाटील यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---