तरुण भारतच्या वृत्ताची दखल; खिर्डी ते बलवाडी मार्गावरील खड्डे बुजवण्यास अखेर सुरुवात…

---Advertisement---

 

खिर्डी ते बलवाडी मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिक, शेतकरी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे दैनिक तरुण भारतने सातत्याने लक्ष वेधत २२ जुलै रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या पाठपुराव्याची अखेर प्रशासनाने दखल घेत संबंधित यंत्रणेमार्फत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

अनेक महिन्यांपासून या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला होता, तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर सातत्याने वृत्तांकन झाल्यानंतर प्रशासनाने हालचाल करत दुरुस्तीचे काम हाती घेतले.

सध्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती सुरू आहे. मात्र, ही केवळ तात्पुरती उपाययोजना असून संपूर्ण रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

स्थानिकांच्या मते, पावसाळ्यात मुरूम टाकून केलेली दुरुस्ती फार काळ टिकणार नाही. त्यामुळे भविष्यात पुन्हा हीच समस्या निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करून संपूर्ण रस्त्याचे दर्जेदार काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---