श्रीमंत बाबा गणपतींचा 15 नवविवाहित जोडप्यांचा हस्ते विधीवत पाटपूजन सोहळा, संकष्ट चतुर्थीनिमित्त पाटपूजन; भाविकांची मोठी उपस्थिती….

---Advertisement---

 

नंदुरबार नंदनगरीतील मानाचा व नवसाचा श्रीमंत बाबा गणपतींचा पाटपूजन सोहळा श्री बाबा गणपती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने काल सोमवारी दि.३१ ऑगस्ट २०२६  रोजी संकष्ट चतुर्थीनिमित्त भक्तीमय वातावरण व उत्साहात पार पडला. या सोहळ्यात नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड.राम चंद्रकांत रघुवंशी व सौ.मेघा राम रघुवंशी यांच्यासह १५ नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते श्रीमंत बाबा गणपतींच्या रथाचे विधीवत पाटपूजन करण्यात आले.

नंदुरबार शहराचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीमंत बाबा गणपतीला शेकडो वर्षांची ऐतिहासिक व धार्मिक परंपरा लाभलेली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी होणार्‍या या पाटपूजन सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. यंदा सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२६  रोजी संकष्ट चतुर्थीचा योग असल्याने सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाटपूजन कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी व सौ.मेघा रघुवंशी यांच्यासह १५ नवविवाहित जोडप्यांनी पारंपरिक पध्दतीने विधीवत श्रीमंत बाबा गणपतींच्या रथाचे पाटपूजन केले. मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने परिसर भक्तीमय झाला होता. या मंगलमय पाटपूजन सोहळ्यास शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भाविकांनी श्रीमंत बाबा गणपतींचे दर्शन घेत सर्वांच्या सुख-समृध्दी, आरोग्य व कल्याणासाठी प्रार्थना केली. गणरायाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. श्री बाबा गणपती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाटपूजन सोहळ्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक उत्साह, श्रध्दा आणि भक्तीच्या वातावरणात पार पडलेल्या या पाटपूजन सोहळ्याने नंदुरबारच्या गणेशोत्सवाची उत्सवी चाहूल अधिकच लागली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळ व सर्व सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.  

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---