---Advertisement---
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर तोंदे फाट्याजवळ सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव वाहनाने अचानक कट मारल्याने खोबऱ्याने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकचा सहचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
बेंगळुरूहून दिल्लीकडे खोबरे घेऊन जाणारा आरजे-11 जीसी-3293 क्रमांकाचा ट्रक तोंदे फाट्याजवळून जात असताना समोरून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने अचानक कट मारला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याबाहेर जाऊन अपघातग्रस्त झाला. अपघाताचा जोर इतका होता की ट्रकचे मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ, महामार्ग पोलीस आणि थाळनेर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी सहचालकाला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. या प्रकरणी पुढील तपास व कायदेशीर कारवाई थाळनेर पोलीस करीत आहेत.









