मतदारांनो, 2 कोटींहून अधिक नावांवर प्रश्नचिन्ह! तुमचं नाव आहे का? आत्ताच तपासा

---Advertisement---

 

महाराष्ट्रातील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेनंतर राज्याची प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर आधीच्या तुलनेत तब्बल 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांची नावे प्रारुप यादीत दिसत नाहीत.

SIR प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी राज्यात 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदार नोंदणीकृत होते. मात्र नव्या प्रारुप यादीत 7 कोटी 71 लाख 65 हजार 562 मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मतदारांची नावे यादीत नसल्याचं समोर आलं आहे.

कोणत्या कारणांमुळे नावे यादीत नाहीत?

गणना प्रपत्र उपलब्ध न होणे, संबंधित मतदार गैरहजर असणे, मतदाराचे स्थलांतर, मृत्यू किंवा दुबार नोंदणी अशा विविध कारणांमुळे काही नावे प्रारुप यादीत समाविष्ट झालेली नाहीत.

नव्या यादीत 3 कोटी 95 लाख 89 हजार 905 पुरुष, 3 कोटी 75 लाख 72 हजार 570 महिला आणि 3 हजार 87 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

नाव वगळलं असेल तर काय करायचं?

मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही, हे तपासणं आता अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रारुप यादीत नाव नसेल किंवा यादीबाबत काही हरकत असेल, तर 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत.

तसंच, 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांनाही मतदार म्हणून नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे.

अंतिम मतदार यादी कधी?

दावे आणि हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

दरम्यान, SIR प्रक्रियेसोबतच राज्यातील मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. आधी असलेल्या 1 लाख 253 मतदान केंद्रांपैकी काही केंद्रे कमी करून आणि नवीन केंद्रे जोडून आता एकूण 1 लाख 216 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

याशिवाय 1,403 मतदान केंद्रांची ठिकाणं बदलण्यात आली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदाराने आपलं नाव आणि मतदान केंद्राची माहिती एकदा नक्की तपासून घ्यावी.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---