तेजश्री प्रधानने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयाने तिच्या चाहत्यांमध्ये आचार्य व्यक्त होत आहे.
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून अचानक एक्झिट घेऊन चाहत्यांना आश्चर्यचकित करणारी तेजश्री आता आणखी एका नवीन वळणावर आहे.
प्राजक्ता माळीच्या आश्रम प्रवासानंतर तेजश्रीनेही हा निर्णय घेतल्याचं पाहून लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, मालिकेची लोकप्रियता शिखरावर असतानाच तिने मालिका सोडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. तिच्या या निर्णयामागचं कारण काय असू शकतं, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही.
तेजश्रीच्या आश्रमातील या प्रवासाने तिच्या चाहत्यांमध्ये उत्कंठा वाढली आहे. तिच्या पोस्टमधून ती आयुष्यात नवा अध्यात्मिक मार्ग स्वीकारत असल्याचं दिसत आहे.