'पुष्पा २' प्रदर्शित झाल्यापासून दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या समोरच्या अडचणी संपायचं नाव घेत नाहीय.

हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी आज सकाळी अटक केली.

4 डिसेंबर 2024 रोजी, ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी भारी गर्दी जमली होती.

यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एक 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिच्या आठ वर्षांच्या मुलगा जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

या घटनेवर अल्लू अर्जुनविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी त्याला अटक करण्यात आली. 

अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.