सर्वांचा आवडता अभिनेता असणारा प्रभास वेगवेगळ्या भूमिकांमधून झळकत आहे.
यात प्रभासचा महादेव अवतार पाहून सारेच थक्क झाले. 'कन्नप्पा' असे या चित्रपटाचे नाव असून, प्रभासचा आजवरचा सगळ्यात वेगळा चित्रपट म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
'कन्नप्पा' मध्ये याआधी अक्षय कुमारचा महादेवाचा अवतार पाहायला मिळाला होता. आता प्रभासचा महादेव अवतार पाहून चाहते खुश झाले आहेत.
हा एक काल्पनिक सिनेमा असून, शिवभक्त कन्नप्पावर आधारित आहे. यात अक्षय कुमारही झळकणार आहे.
दोन सुपरस्टार असल्याने आणि दोघेही महादेवाच्या भूमिकेत असल्याने हा काय प्रकार आहे, हे २५ एप्रिलला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजणार आहे.