मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आदिती द्रविडने नुकताच साखरपुडा आटोपला.
अभिनेत्री, गीतकार आणि नृत्यांगना असणाऱ्या आदितीने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली.
तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव मोहित लिमये असून तो ट्रॅव्हल कंपनीशी संबंधित क्षेत्रात कार्यरत आहे.
विशेष म्हणजे, आदिती क्रिकेटपटू राहुल द्रविडची पुतणी आहे.
उत्तम अभिनेत्री असणारी आदिती उत्तम कवयित्री आहे.
'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील 'मंगळागौर' गाणे आदितीने लिहिले होते.