बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

आता देखील अभिनेत्री एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

सांगायचं झालं तर, माधुरी तिच्या कुटुंबासोबत रॉयल आणि आलिशान आयुष्य जगत आहे.

महिन्याला अभिनेत्री पती श्रीराम नेने यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांमध्ये कमाई करत आहे.

 पण, आता या कमाईत    आणखी वाढ होणार आहे.  

 अभिनेत्री माधुरी दीक्षितने अभिनयासोबत आता व्यवसायिक क्षेत्रात पाऊल टाकत आपल्या उत्पन्नाचे स्रोत वाढवले आहेत.

मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात असलेले एक आलिशान ऑफिस भाडेतत्त्वावर देऊन माधुरी महिन्याला जवळपास 3 लाख रुपयांचे भाडे कमावणार आहे. हे ऑफिस एका खासगी कंपनीला दिले गेले आहे.