अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री आहे.
तिची मालिका
‘होणार सून मी ह्या घरची’
प्रेक्षकांमध्ये विशेष गाजली होती.
जान्हवी आणि श्रीची गोड केमिस्ट्री, कुटुंबातील नाते आणि भावनिक गोष्टींमुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं.
तेजश्रीच्या सहजसुंदर अभिनयशैलीने जान्हवी हे पात्र प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला.
तिने याशिवायही अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ज्यामुळे तिचं नाव मराठी मनोरंजन क्षेत्रात उंचावलं आहे.
तेजश्रीच्या सहजसुंदर व्यक्तिमत्त्वामुळे ती नेहमीच प्रेक्षकांची लाडकी राहिली आहे.