अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित 'केसरी २' पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे.

जालियनवाला बाग गोळीबार या ऐतिहासिक प्रकरणावर सिनेमा आधारित आहे. नुकताच याचा टीझर आला आहे.

सिनेमात अक्षयकुमार वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. तर आर माधवन आणि अभिनेत्री अनन्या पांडेचीही यामध्ये भूमिका आहे. दरम्यान, सिनेमातील अनन्याचा पांडेचा लूक व्हायरल झाला आहे. 

तिचा लूक पाहून नेटकरी प्रभावित झाले आहेत. रेडिट पोस्टवर केसरी चॅप्टर २चं एक पोस्टर व्हायरल होत आहे. अक्षय कुमार आणि आर माधवनचा क्रॉस फोटो आहे. तर मध्ये अनन्या पांडे दिस आहे. 

पांढरी ब्रिटिश स्टाईल साडी, त्या काळातली हेअरस्टाईल, हातात फाईल असा तिचा लूक आहे. अनन्या पांडे ब्रिटिश भूमिकेत आहे का? अशीही चर्चा सुरु आहे. 

अद्याप अनन्याच्या भूमिकेबद्दल आणि लूकबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अक्षय कुमार सिनेमा वकील आहे 

त्यामुळे अनन्या पांडे कदाचित प्रॉसिक्युटन वकील असेल, असा अंदाज नेटकरी लावत आहेत. 

निर्मात्यांनी मात्र अद्याप तिच्या भूमिकेबद्दल गुप्तता पाळली आहे.