अनन्या पांडेचे घर  महालासारखे सजले

बी-टाऊन अभिनेत्री आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूकसाठी जास्त प्रसिद्ध आहे.

सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते आणि फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. अनन्याने लहान वयातच खूप यश मिळवले आहे.

गेल्या वर्षी अभिनेत्रीने मुंबईत पहिला अपार्टमेंट विकत घेतला. अभिनेत्रीचे अपार्टमेंट त्याच इमारतीत आहे जिथे तिचे पालक राहतात. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान अनन्या पांडेने तिच्या घराची झलक दाखवली. बघूया.

एका यूट्यूब चॅनेलवरील संभाषणादरम्यान, अभिनेत्रीने तिच्या घराशी असलेल्या भावनिक जोडाबद्दल सांगितले. यावेळी चंकी पांडेही उपस्थित होता आणि त्याने सांगितले की, त्याचं बालपण याच घरात गेले.

अनन्याने सांगितले की ती पहिल्या मजल्यावर संयुक्त कुटुंबात राहत होती आणि तिचे तीन वेगवेगळे अपार्टमेंट होते. आमच्या कुटुंबात ओपन डोअर फॅमिली पॉलिसी होती, कारण माझ्या आजीला बंद दरवाजे आवडत नव्हते.