युट्युबर रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गदारोळ झाल्यानंतर कॉमेडियन समय रैनाने 'इंडियाज गॉट लॅटेंट' या शोचे सर्व एपिसोड डिलीट केले आहेत.

रणवीरने आक्षेपार्ह विधान केले, तेव्हा या शोमध्ये आशिष चंचलानी व अपूर्वा मुखिजा हे दोघेही पाहुणे म्हणून आले होते. 

या प्रकरणी पोलिसांनी तिची चौकशी केली, तसेच तिचा जबाब नोंदवला. 

त्यानंतर ती बुधवारी एका कार्यक्रमात पोहोचली होती. 

त्या कार्यक्रमातील तिचे अशोभनीय कपडे पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले.

 प्रसिद्धीसाठी ती काहीही करू शकते. 

निदान सार्वजनिक ठिकाणी कपडे घालण्याचे भान असले पाहिजे, 

असे नेटकऱ्यांनी तिला सुनावले आहे.