अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर, रकुल प्रीत स्टारर 'मेरे हसबंड की बीवी' हा चित्रपट २१ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अर्जुन, भूमी आणि रकुलची कॉमेडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

अर्जुन आणि भूमी दुसऱ्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याआधी दोघांनी २०२३ मध्ये 'द लेडी किलर' चित्रपटात काम केले होते.

हा एक क्राईम थ्रिलर चित्रपट होता. प्रमोशनदरम्यान भूमीने अर्जुनचे तोंड भरून कौतुक केले.

ती म्हणाली, मी काम केलेल्या सर्वांत सुरक्षित सह-कलाकारांपैकी तो एक आहे. अर्जुनला त्याच्या सहकलाकारांबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कोणतीही असुरक्षितता वाटत नाही.

सेटवर चित्रपटाच्या नायकाला स्वतःपेक्षा चित्रपटाची जास्त काळजी असते, असे क्वचितच घडते. अर्जुन नारळासारखा आहे. जे बाहेरून कठीण आहे, पण आतून मऊ आहे. 

    तो लोकांना प्रोत्साहन देतो. अर्जुनसोबत काम केलेल्या कोणालाही माहिती असेल की, तो खूप सुरक्षित, दयाळू आणि शिक्षित आहे.