अभिनेत्री तमन्ना भाटिया केवळ आपल्या अभिनयासाठीच नाही, तर तिच्या उत्तम फिटनेस आणि सुंदरतेसाठी देखील ओळखली जाते.
अर्थात तिचे शरीरसौष्ठव अनेकांना प्रेरणा देते.
तमन्ना भाटियाच्या फिटनेस रूटीनमध्ये तिच्या सकाळच्या डिटॉक्स ड्रिंकचे महत्त्व खूप आहे.
सध्या "स्त्री 2" चित्रपटातील "आज की रात मजा हुस्न का" गाण्याने तिच्या लोकप्रियतेत भर घातली आहे.
पण यशाच्या या शिखरावर पोहोचण्यासाठी तमन्नाने जी मेहनत केली आहे, ती देखील अतिशय प्रेरणादायी आहे.
फिट राहण्यासाठी ती जिममध्ये तासनतास घाम गाळतेच, पण त्याबरोबर काही खास ड्रिंक्स देखील तिच्या रूटीनचा भाग आहेत.
त्यातले एक खास ड्रिंक तमन्ना प्रत्येक सकाळी पिते,
आणि तेच तिच्या फिटनेसचे गुपित आहे.