८० आणि ९०च्या दशकातील सुपरस्टार असलेल्या गोविंदाने एका मुलाखतीत सांगितले की, एकेकाळी त्यांच्याकडे एकाच वेळी ४९ चित्रपट होते; 

परंतु दिलीप कुमारमुळे त्यांना २५ चित्रपट सोडावे लागले. एकदा त्याने १०० कोटी रुपयांचा चित्रपट नाकारला होता. 

याचा पश्चात्ताप करून ते आरशात बघून स्वतःला थप्पड मारायचे. संभाषणात गोविंदाला विचारण्यात आले की, तो सेटवर उशिरा का येत असे. 

यावर तो म्हणाला, कोणताही माणूस एकाच वेळी ७५ चित्रपट करू शकत नाही. त्यावेळी माझे ४९ चित्रपट फ्लोअरवर होते. एका सेटवरून दुसऱ्या सेटवर, दुसऱ्या सेटवरून तिसऱ्या सेटवर जायचो. 

त्याशिवाय, मी एक अशिक्षित माणूस चित्रपट क्षेत्रात आलो. दिलीप कुमार तिथे नसते तर मेलोच असतो. दिलीप कुमार यांनी मला २५ चित्रपट सोडायला लावले होते.

मी त्यांना सांगितले की, जर मी इतके चित्रपट सोडले, तर त्यांना पैसे परत करावे लागतील. ते म्हणाले, मी कुठूनतरी ते तुमच्यासाठी आणतो.

  तुम्ही फॉर्म भरा, पण चित्रपट सोडून द्या. मी २५ चित्रपट सोडले.