चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी अलिकडेच एक जुना किस्सा आठवला.
त्यांनी सांगितले की एक काळ असा होता जेव्हा माधुरी दीक्षितने इंडस्ट्रीत नवीन असलेल्या गोविंदासोबत चित्रपट करण्यास नकार दिला होता.
निहलानी म्हणाले की, त्यावेळी माधुरी चित्रपटसृष्टीत स्वतःला स्थापित करण्याचा प्रयत्न करत होती आणि हा निर्णय तिच्या सेक्रेटरी रिक्कू राकेश नाथमुळे घेण्यात आला.
निहलानी म्हणाले की, रिक्कूने माधुरीला समजावून सांगितले की गोविंदासोबत काम करणे हा योग्य निर्णय ठरणार नाही.
त्यामुळे माधुरीने बरेच चित्रपट नाकारले. 'इल्जाम' हा चित्रपट त्यापैकीच एक होता.
नंतर त्यात मी नीलमला घेतले आणि चित्रपट सुपरहिट ठरला.
असे अनेक चित्रपट त्यावेळी माधुरीने गोविंदामुळे नाकारले आणि ते प्रचंड यशस्वी ठरले.