tarunbharatlive.com

प्रयागराजमध्ये धार्मिक उत्सवाची शाही सुरूवात !

भारतासह संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या महाकुंभ मेळ्याचा आयोजन 2025 मध्ये प्रयागराजमध्ये होणार आहे. यंदा हा मेळा 13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेच्या दिवशी सुरू होईल आणि 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप होईल.

tarunbharatlive.com

हा ऐतिहासिक उत्सव 12 वर्षांनी होणारा असून त्यात विविध धार्मिक कृत्ये, शाही स्नान आणि साधू महात्म्यांचे उपस्थिती असणार आहेत.

tarunbharatlive.com

महाकुंभ 2025 शाही स्नानाची तारीख

tarunbharatlive.com

पौष पौर्णिमा – 13 जानेवारी 2025 मकर संक्रांती – 14 जानेवारी 2025 मौनी अमावस्या – 29 जानेवारी 2025 वसंत पंचमी – 3 फेब्रुवारी 2025 माघ पौर्णिमा – 12 फेब्रुवारी 2025 महाशिवरात्री – 26 फेब्रुवारी 2025

tarunbharatlive.com

महाकुंभ मेळ्याचे आयोजन देशभरातील चार पवित्र स्थानांवर होत आहे—प्रयागराज, हरिद्वार, नाशिक, आणि उज्जैन.

महाकुंभ आयोजन स्थळे आणि तयारी 

tarunbharatlive.com

यंदा 2025 मध्ये महाकुंभ मेळा विशेषतः प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात येत आहे. या सोहळ्यात नागा साधूंची प्रमुख उपस्थिती असते, ज्यांना मेळ्याचं मुख्य आकर्षण मानलं जातं.

tarunbharatlive.com

उत्तर प्रदेश सरकारची तयारी प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्याला लक्षात घेता उत्तर प्रदेश नगर पालिकेने अत्यंत तयारी सुरू केली आहे. महाकुंभ मेळ्याच्या प्रवाशांसाठी अतिरिक्त 6800 बसेस आणि 200 वातानुकुलित बसेस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे यात्रेकरूंची प्रवासाची सोय सुलभ होईल, विशेषतः महिला आणि वृद्धांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करणे देखील सरकारच्या योजनेत आहे.

tarunbharatlive.com

महाकुंभ 2025 साठी वर्धमान तयारी आणि व्यवस्थापनामुळे हा धार्मिक उत्सव भव्य स्वरूपात आयोजित केला जाईल, ज्यात लाखो भक्त सहभाग घेतील.

tarunbharatlive.com