टायगर श्रॉफच्या वाढदिवसानिमित्त निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी टायगरच्या चाहत्यांना भेट देत 'बागी ४' मधील अभिनेत्याच्या लूकचे नवीन पोस्टर प्रदर्शित केले. नाडियादवाला ग्रॅण्डसन प्रॉडक्शनच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर त्याचा इंटेन्स लूक पाहायला मिळत आहे.

वाढदिवसाच्या शुभेच्छा टायगर श्रॉफ. रॉनी, तुझे पुढचे वर्ष अॅक्शनने भरलेले जावो. शुभेच्छा, असे त्यांनी पोस्टमध्ये टायगरला टॅग करीत लिहिले आहे.

पोस्टमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील नमूद आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नवीन पोस्टरमध्ये टायगरचा अर्धा चेहरा दिसत आहे. त्याच्या डोक्यातून रक्त येत आहे आणि तो इंटेन्स लूकमध्ये दिसत आहे. 

टायगरने त्याच्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून पोस्टर शेअर केले. त्याने बागी फ्रँचायझीबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत. ज्या फ्रँचायझीने मला एक ओळख दिली आणि स्वतःला अॅक्शन हिरो म्हणून सिद्ध करण्याची संधी दिली, आता तीच फ्रँचायझी माझी ओळख बदलत आहे. 

यावेळी तो पूर्वीसारखा नाही; पण मला आशा आहे की,

 तुम्ही त्याला ८ वर्षांपूर्वी जसा स्वीकारला होता,

तसाच स्वीकाराल, असे लिहिले आहे.