'तेनाली रामा' मालिकेत मायावी गिरगिट राजने विजयनगरमध्ये अराजक माजविण्यासाठी एक हत्ती मोकळा सोडून आपला दुष्ट हेतू आधीच स्पष्ट केला.
आफरीन एका नर्तकीच्या रूपात विजयनगर साम्राज्यात शिरकाव करते, आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड उगवण्याचा हेतू तिच्या मनात आहे.
राजा कृष्णदेवराय हे तिचे मुख्य लक्ष्य आहे. विषकन्या ही भूमिका करणे माझ्यासाठी एक रोमांचक आव्हान आहे.
ही एक रहस्य, मोहकता आणि सूड भावनेने भरलेली व्यक्तिरेखा आहे.
वरकरणी मोहक मुखवटा ठेवून परिस्थिती आपल्याला हवी तशी वाकवून घेण्याची तिची क्षमता आहे, असे पवित्राने सांगितले.