मालिकाविश्वातून मराठी चित्रपटात आलेली अभिनेत्री प्रार्थनाबेहेरे लवकरच एका नव्या कोऱ्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
विशेष म्हणजे, याचे दिग्दर्शन तिचा नवरा अभिषेक जावकर करणार आहे.
याविषयी स्वतः प्रार्थनाने माहिती दिली. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला.
नवरा दिग्दर्शक आणि ती अभिनेत्री असा त्यांचा हा पहिलाच चित्रपट राहणार आहे.
प्रार्थनाचा नवरा अभिषेक हा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे.
काही वर्षांपूर्वी त्याने स्वतःची 'रेड बल्ब स्टुडिओज' नावाची निर्मिती संस्था सुरू केली. 'मिसिंग ऑन वीकेंड' या हिंदी चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.
त्याने काही तेलुगू चित्रपटांचे वितरणदेखील केले आहे.
मूळ 'सिंघम' चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे.
आता नव्या चित्रपटाचे नाव अद्याप प्रार्थना किंवा अभिषेकने जाहीर केलेले नाही.