मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरने हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत चांगला जम बसवला आहे. 

नुकताच तिचा 'सन ऑफ सरदार-२' प्रदर्शित झाला. याच्या प्रीमियरला रजनीकांतचा माजी जावई धनुषदेखील हजर झाला. 

त्यावेळी धनुष आणि मृणाल यांच्यातील जवळीक पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. 

त्यांच्या वयातील अंतर मात्र विचार करायला लावणारे आहे. धनुष ४२ वर्षांचा असून, दोन मुलांचा बाप आहे. 

मृणाल ३३ वर्षांची आहे. दोघांनी आजवर एकाही सिनेमात एकत्र काम केलेले नाही.

तरीही त्यांची गाढ मैत्री दिसते आहे. यावरून सध्या तरी त्यांना आपले प्रेम गुपितच राहावे, असे वाटत आहे. 

धनुषचा नुकताच ऐश्वर्यासोबत घटस्फोट झाला आहे.