सई ताम्हणकरचे अनेक चित्रपट, वेबसीरिज गाजल्या. 

सध्या ती एकापाठोपाठ एक अनेक बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये काम करीत आहे.

आपल्या कामाच्या जोरावर आता तिने 'आयएमडीबी'च्या आघाडीच्या दहा अभिनेत्रींच्या यादीत स्थान पटकावले आहे. 

मनोरंजन जगतात सगळ्यात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या -

'आयएमडीबी'ची या आठवड्याची आवडत्या कलाकारांची यादी -

नुकतीच समाज माध्यमांवर आली असून -

त्यात सई अव्वल दहामधील मानकरी ठरली आहे.

 आगामी काळात सई क्राईम बीट, डब्बा कार्टेल, ग्राऊंड झिरो, मटका किंग यासारख्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.