बऱ्याच कालावधीनंतर इमरान हाश्मीचा चित्रपट झळकतो आहे.

'ग्राऊंड झिरो' असे या चित्रपटाचे नाव असून यात इमरानसोबत सई ताम्हणकर ही मराठी अभिनेत्री झळकणार आहे.

 सईने स्वतः याविषयीची माहिती दिली.

 सई मराठीसोबतच हिंदीतही आपले स्थान निर्माण करत आहे.

या चित्रपटात इमरान हाश्मी बीएसएफ जवानाची भूमिका साकारणार आहे.

 हा चित्रपट २००१ मध्ये दिल्ली संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतरच्या सिक्रेट मिशनवर आधारित आहे.

 नुकतेच या सिनेमाचे पोस्टरही जारी झाले आहे. येत्या २५ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.