'सैयारा' या चित्रपटाने यंदा तरुणाईला चांगलेच वेड लावले.
त्यामुळे यातील कलाकारही प्रसिद्धीच्या झोतात आले. यातील मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री अनिता पड्डा लवकरच आणखी एका प्रेमकथेत दिसणार आहे.
'बँड बाजा बारात' फेम दिग्दर्शक मनीष शर्मा अनितसोबत एक रोमँटिक चित्रपट बनवणार आहेत.
अनितचा हा चित्रपट यशराज फिल्म्स निर्मित करणार आहे.
करिअरच्या सुरुवातीलाच तिला यशराजसारख्या बॅनरचा चित्रपट मिळणे, ही फार मोठी बाब मानली जात आहे.
अनितचा हा रोमँटिक चित्रपट पंजाबवर आधारित असेल.
त्याचबरोबर चित्रपटाचे चित्रीकरण २०२६ च्या पहिल्या सहामाहीत सुरू होईल.
चित्रपटात अनितच्या विरुद्ध कोण असेल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.