दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.
एका मुलाखतीत तिने आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली. तिने यापूर्वीही आपला असाध्य आजार मायोसिटिसविषयी उल्लेख केला आहे.
ती सांगते की, जेव्हा मला माझ्या ऑटोइम्यून आजाराबद्दल कळले तेव्हा मी माझ्या आरोग्याबाबत खूप निष्काळजी होते आणि पूर्णपणे एकटी होते. कुठून सुरुवात करावी, हेही समजत नव्हते.
हा एक जुनाट आजार आहे आणि तो असाध्यदेखील आहे. जेव्हा मला सांगण्यात आले की माझे संपूर्ण आयुष्य असेच राहील, नाहीतर परिस्थिती आणखी बिकट होईल.
त्यावेळी अतिशय असहाय वाटले. मला लोक करिअरविषयी विचारायचे. माझ्याकडे याचे कोणतेही उत्तर नाही. भविष्यात मी काय करणार, हेही मला माहिती नाही.
फक्त मिळेल ते काम करणे, एवढेच ध्येय समोर ठेवले आहे.