सचिन तेंडुलकरांनी त्यांची मुलगी साराच्या नवीन कामाबद्दल आणि नवीन भूमिकेबद्दल इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, सारा तेंडुलकर सचिन तेंडुलकर फाऊंडेशनमध्ये संचालक म्हणून सामील झाली आहे, हे सांगताना मला खूप आनंद होत आहे.

 सचिन तेंडुलकर फाउंडेशन ही दिग्गज भारतीय क्रिकेटपटूद्वारे चालवली जाणारी एक NGO आहे, जी मुलांच्या विकासासाठी, आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी काम करण्यावर भर देते.

सारा तेंडुलकरने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. साराने या वर्षी आपले शिक्षण पूर्ण केले असून आता ती सचिन तेंडुलकर फाऊंडेशनमध्ये संचालक म्हणून काम करणार आहे.

 पदव्युत्तर पदवीच्या काळातही, साराने  एनजीओला अनेकदा भेट दिली होती, ज्यामुळे तिचा कल मुलांच्या शिक्षण आणि विकासाकडे असल्याचे दिसून आले.

सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी सारा तेंडुलकरने आपल्या आईसोबत ग्रामीण भागात जाऊन एनजीओसाठी खूप काम केले आहे. सारा त्या सर्व कामांचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत आहे.