अजय देवगण, रितेश देशमुखच्या 'रेड-२' मध्ये लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटियाचा प्रवेश झाला आहे.
अजय देवगण यात अमेय पटनायक या अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार असून, रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत राहणार आहे.
'दादाभाई' असे त्याच्या भूमिकेचे नाव आहे.
तमन्ना एका खास गाण्यासाठी चित्रपटात दिसणार असून तिच्यासोबत यो यो हनीसिंगही राहणार आहे.
तमन्ना आणि हनीसिंगचे गाणे एक प्रमोशनल स्वरूपाचे असून, ते सिनेमाच्या शेवटी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
येत्या ३ आणि ४ एप्रिलला या गाण्याचे चित्रीकरण होणार आहे.