'होणार सून मी या घरची' या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान अनेकांची आवडती अभिनेत्री आहे. 

अनेक चित्रपटांतूनही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

आता तिचे पहिले पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 

या पुस्तकात तेजश्रीच्या निवडक मुलाखतींचा संग्रह करण्यात आला आहे. 

'अभिनेत्री तेजश्री प्रधान निवडक मुलाखती' असे या पुस्तकाचे नाव असून त्याचे संपादन सुनील पांडे यांनी केले आहे.

प्राजक्त प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. 

 वेगवेगळ्या मुलाखतीत तेजश्रीने मांडलेले विचार या पुस्तकाच्या निमित्ताने एकाच ठिकाणी चाहत्यांना वाचता येणार असून हे पुस्तक अॅमेझॉनवर उपलब्ध आहे.