भारतीय विज्ञानामध्ये महिलांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहिले आहे. मात्र, या भारतीय महिला शास्त्रज्ञांनी आपल्या कार्यातून केवळ विज्ञान क्षेत्रात नव्हे, तर संपूर्ण जगात भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. चला, त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा वेध घेऊया..!
- देशाच्या पहिल्या सेल बायोलॉजिस्ट (Cell Biologist) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमला रणदिवे यांनी कॅन्सरवरील संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. – त्यांनी आदिवासी महिला आणि मुलांमधील कुपोषणाविरोधात लढा दिला. – भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना 1980 मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला.
– कॅन्सर आणि मलेरियाविरोधी औषधांच्या विकासात त्यांनी मोलाचे कार्य केले. – द्राक्षवेलीच्या फळ आणि सालापासून पोटाच्या आजारांवरील उपचार शोधले. – त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील कार्याची पावती म्हणून त्यांना 1975 मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
– त्यांनी Pi-meson (Pion) या नव्या सब-अटॉमिक कणाचा शोध लावला. – होमी भाभा यांनी त्यांची टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) मध्ये निवड केली होती. – त्या भारताच्या कण भौतिकी संशोधनात महत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिला शास्त्रज्ञ ठरल्या.
– वनस्पती जीवशास्त्रात (Botany) उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी उसाची अधिक गोड जात तयार केली. – त्यांनी पर्यावरण आणि जैवविविधतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
– त्या भारतीय विज्ञान संस्थान (IISc) मधून पीएचडी करणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत्या. – महिलांसाठी IISc मध्ये प्रवेश मिळवून देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
– त्यांनी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि हवामान अंदाज यावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. – त्यांचे हवामानविषयक उपकरणांवरील संशोधन आजही मौल्यवान मानले जाते. – त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील कार्याची पावती म्हणून त्यांना 1987 मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
– त्यांनी CERN सोबत हिग्स-बोसॉन कणाच्या शोधात महत्त्वपूर्ण योगदान दिले. – विज्ञान क्षेत्रात महिलांसाठी नवीन संधी निर्माण करण्यास मदत केली. – त्यांना त्यांच्या विज्ञान सेवेसाठी 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.
- या एक नामांकित ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञ आहेत. - जागतिक अर्थशास्त्र क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. - अनेक विद्यापीठांमध्ये अध्यापन व संशोधन करणाऱ्या अनिता या आर्थिक धोरणे व जागतिक अर्थव्यवस्थेतील तज्ज्ञ मानल्या जातात.
– त्या इस्रोच्या चांद्रयान-2 मिशन च्या संचालक होत्या. – त्यांनी भारताच्या मंगळयान मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली. – त्यांचे योगदान भारताच्या अंतराळ संशोधनात क्रांतिकारी ठरले.
आपल्या प्रिय शास्त्रज्ञांविषयी आपला अभिप्राय म्हणून हा लेख शेअर करा!
आपल्या प्रिय शास्त्रज्ञांविषयी आपला अभिप्राय म्हणून हा लेख शेअर करा!
डिझाईन व लेख : मयूर विसपुते