'उरी-द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपट प्रदर्शित होऊन सात वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

त्यात बालकलाकार म्हणून झळकलेली रिवा अरोरा आता मोठी झाली आहे.

चित्रपटात तिने विकी कौशलच्या भाचीची भूमिका साकारली होती.

रिवाला आता पाहिल्यावर कोणीही ओळखू शकणार नाही. अवघ्या १९ व्या वर्षी तिने डॉक्टरेट मिळवली आहे.

'डिजिटल एन्फ्लुएन्स अॅण्ड वुमन एम्पॉवरमेंटर' या विषयावर तिने प्रबंध सादर केला होता.

    आदिशंकर वैदिक विद्यापीठातून तिला पीएच. डी. पदवी मिळाली आहे.

 स्वप्न पूर्ण झाल्याचा अभिमान वाटतो आहे, असे तिने फोटोसोबत लिहिले आहे.