दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या अफेअरच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहेत.

या दोघांचे चाहते त्यांच्या नात्याबद्दल नेहमीच उत्सुक असतात. 

नुकताच त्यांना एका डेटवर एकत्र पाहिल्याने ही चर्चा अधिकच रंगतदार झालीय.

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाने आता त्याच्या प्रेमजीवनाबद्दल थोडासा खुलासा केला आहे.

अभिनेत्याने आपल्या नातेसंबंधांबाबत एक स्पष्ट वक्तव्य केले आहे.

त्याने सांगितले की, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अत्यंत जागरूक आहे

"जेव्हा मला वाटेल की जगाला हे जाणून घेण्याची गरज आहे, तेव्हा मी नक्कीच या गोष्टी सर्वांसोबत शेअर करेन. सध्या याबद्दल बोलण्यासाठी मी तयार नाही."

त्याच्या या वक्तव्यावरून त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य द्यायचे आहे, असे दिसते. जरी त्याने रश्मिकाचे नाव थेट घेतले नसले, तरी या चर्चांवर पूर्णविराम लागण्याची शक्यता मात्र कमी आहे. विजय-रश्मिकाच्या चाहत्यांसाठी आता पुढील अपडेट्सची प्रतीक्षा राहणार आहे.