पहिल्या भागात पुष्पा राज (अल्लू अर्जुन) हा चंदनाच्या तस्करीच्या व्यवसायात कसा वर येतो, यावर कथा केंद्रित होती. तो आपल्या कष्टाने आणि चातुर्याने एक प्रभावशाली डॉन बनतो. मात्र, या यशासोबत त्याला पोलीस अधिकारी भंवर सिंग शेखावत (फहाद फासिल) याच्या आव्हानांचा सामना करावा लागतो.
'पुष्पा 2' या चित्रपटात प्रेम आणि राजकीय पंचाचा समतोल राखणारी कथा साकारण्यात आली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांवर प्रभावी परिणाम होतो. पुष्पाच्या व्यक्तिरेखेचा गाभा म्हणजे तो एक असा माणूस आहे जो स्वतःच्या मनाने वागतो, पण त्याच्या वागण्यामागे भावनिक प्रेरणा असते.
प्रेम ही भावना त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीने दिसते. अर्थत पुष्पाला त्याच्या प्रेमात कोणतेही बंधन नको असते. तो प्रेमातही स्वतःची ओळख गमावत नाही. हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य आहे.
पुष्पा बऱ्याचदा डोक्याने नाही, तर हृदयाने निर्णय घेतो. त्याच्या वागण्यात दयाळूपणा आणि निष्ठा दिसून येते, जरी तो बाहेरून खडूस आणि अडेलतट्टू वाटत असला तरी. श्रीवल्लीबरोबर त्याचे नाते प्रेमाचा सच्चेपणा आणि त्याग दाखवते. हे नाते त्याच्या जीवनातील संघर्षात मानसिक आधार देते.
पुष्पा बऱ्याचदा डोक्याने नाही, तर हृदयाने निर्णय घेतो. त्याच्या वागण्यात दयाळूपणा आणि निष्ठा दिसून येते, जरी तो बाहेरून खडूस आणि अडेलतट्टू वाटत असला तरी. श्रीवल्लीबरोबर त्याचे नाते प्रेमाचा सच्चेपणा आणि त्याग दाखवते. हे नाते त्याच्या जीवनातील संघर्षात मानसिक आधार देते.
राजकीय दृष्टिकोनातून, पुष्पा एक सामान्य माणसाचा प्रतिनिधी आहे जो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभा राहतो. त्याच्या कृतीतून समाजातील विषमता आणि अन्याय यावर प्रकाश टाकला जातो. पुष्पा आपल्या मूळ परिस्थितीवर कधीही समाधान मानत नाही. तो इतरांनाही लढा देण्याची प्रेरणा देतो.
राजकीय वातावरणात तो नेतृत्वाची धडाडी दाखवतो. तो केवळ स्वतःसाठीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी उभा राहतो, जो त्याला खऱ्या 'रूलर'च्या भूमिकेत आणतो. एकूणच 'पुष्पा 2' प्रेम आणि सत्तेच्या संघर्षाच्या अनोख्या गोष्टीने प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो, ज्यामुळे चित्रपट केवळ मनोरंजन नसून सामाजिक संदेशही देतो.