‘द केरळ स्टोरी’ खोटी म्हणणार्‍यांना सणसणीत चपराक, २६ पीडित महिला माध्यमांसमोर

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ प्रोपोगंडा आहे, या सिनेमाची कथा खोटी आहे म्हणणार्‍यांना आता निर्मात्यांनी थेट उत्तर दिलं आहे. आयएसआयएसमध्ये सामील होण्यासाठी ज्यांना प्रवृत्त केले गेले अशा २६ पिडीतांना निर्माता विपुल शहा यांनी माध्यमांसमोर आणलं आहे. विपुल शहांच्या या कृतीमुळे ‘द केरळ स्टोरी’ खोटी आहे, असे म्हणणार्‍यांना सणसणीत चपराक बसली आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ‘द केरळ स्टोरी’ च्या संपूर्ण टीमने हजेरी लावली. यावेळी आयएसआयएसमध्ये सामील होण्यासाठी ज्यांना प्रवृत्त केले गेले अशा २६ पिडीतांनी देखील व्यासपीठावर हजेरी लावली. चित्रपटातील नायिका अदा शर्मासह अन्य कलाकारांनी खर्‍या आयुष्यातील या पिडीतांची भेट घेत संवाद साधला. यावेळी विपुल शहांनी पिडितांना ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली.

यावेळी निर्माते विपुल शहा म्हणाले, आमचा चित्रपट प्रोपोगंडा असल्याची टीका झाली. मात्र हे सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. चित्रपटाचं जे व्हायचं असेल ते होईल, पण आता आमचं ध्येय या मुलींना वाचवणं आहे. आम्ही चित्रपटातून तीन मुलींच्या माध्यमातून ३२ हजार मुलींची गोष्ट सांगितली आहे. आकड्यावरून काही लोकांनी आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

दिग्दर्शक सुदिप्तो सेन म्हणाले, दहशतवाद भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे. पण इतर देशांमध्ये दहशतवादाविरोधात विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आहेत. आपल्या देशात दहशतवादाला धर्म नसतो असं म्हटलं जातं. पण दुर्दैवाने जेव्हा केरळचा प्रश्न आला तेव्हा लगेच लोक धर्माबद्दल बोलू लागले. माझ्या मते या चित्रपटातून आम्ही इस्लाम धर्माची सेवाच केली आहे. कारण या धर्माचा गैरवापर होतोय. हा किती मोठा धोका आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक देशभक्त भारतीयाने हा चित्रपट पाहायला हवा.