कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ; काय आहे नवीन दर?

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत आज वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. ब्रेंट क्रूडची किंमत 83 डॉलरच्या वर गेली आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किरकोळ किमतींवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. आज अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत, तर काही ठिकाणी दर घसरले आहेत.

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, नोएडामध्ये पेट्रोल 35 पैशांनी घसरून 96.65 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 32 पैशांनी स्वस्त होऊन 89.82 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. गुरुग्राममध्ये पेट्रोल 29 पैशांनी महाग झाले असून ते 97.00 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. येथे डिझेल 29 पैशांनी महागले असून ते 89.88 रुपये प्रति लिटर झाले आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोल 16 पैशांनी घसरून 108.45 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 14 पैशांनी घसरून 93.69 रुपये प्रति लिटरवर पोहोचले.

कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासात त्याच्या किमतीत आणखी वाढ होणार आहे असे सांगण्यात येत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 83.44 पर्यंत वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआयचा दरही प्रति बॅरल $79.40 वर पोहोचला आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर.
मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रतिलिटर.
चेन्नईत  पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
कोलकाता येथे पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल  92.76 रुपये प्रति लिटर आहे.