“थोडी लाज वाटू दे” शामीने हसन रझाला का झापले?

वर्ल्डकप 2023 च्या 33 व्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला. या विजयानंतर जगभरातील अनेक माजी क्रिकेटपटू टीम इंडियाचे कौतुक केलं. दुसरीकडे पाकिस्तानचा माजी क्रिकेटर हसन रझाने भलताच दावा केला होता. मुंबईत गुरुवारी श्रीलंकेवर मोठा विजय मिळवल्यानंतर हसन रझा यांनी भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांवर धक्कादायक टिप्पणी केली होती. या सामन्यात चेंडूसोबत छेडछाड झाल्याचा आरोप हसन रझांनी केला होता. त्यांच्या आरोपांवरुन मोठा गदारोळ उडाला. अशातच आता भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यानेही संताप व्यक्त करत तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले होते हसन रझा?
“जेव्हा भारताचे खेळाडू फलंदाजी करत असतात तेव्हा ते खरोखरच चांगली फलंदाजी करतात. पण जेव्हा भारत गोलंदाजी करतो तेव्हा अचानक चेंडूचं नाटक सुरू होते. सात ते आठ डीआरएसचे निर्णय असे होते जे संशयास्पद होते  सिराज आणि शमी ज्या पद्धतीने चेंडू स्विंग करत होते, त्यावरून असे वाटत होते की, आयसीसी किंवा बीसीसीआय त्यांना वेगवेगळे चेंडू देत आहेत. त्या चेंडूची चौकशी होणं गरजेचं आहे. स्विंगसाठी बॉलवर कोटिंगचा अतिरिक्त थर देखील असू शकतो,” असे हसन रझा म्हणाले होते.

शामीने हसन रझाला झापले?
मोहम्मद शामीने ट्विटर आणि इन्स्टाग्रावर हसन रझा याचा समाचार घेतला. त्याची लाजच काढली. शामी म्हणाला की,  थोडी लाज वाटू द्या रे. खेळावर लक्ष केंद्रित करा. बाकीच्या फालतू गोष्टींवर नाही.  दुसऱ्याच्या यशाचाही आनंद घ्या. हा विश्वचषक आहे, एखादी द्विपक्षीय मालिका नाही. तू एक खेळाडू राहिलाय. वसीम भाईने देखील तुम्हाला सांगितले आहे. दिग्गज वसीम भाईवर तरी विश्वास ठेवा. स्वतःचेच कौतुक करत आहात जस्ट लाईक वाव…

हसन रझा याच्या वक्तव्यावर माजी खेळाडू वसीम अक्रम यांनीही भडक प्रतिक्रिाय दिली होती. हे हास्यस्पद असल्याचे वसीम अक्रम म्हणाले होते. त्याशिवाय त्यांनी चेंडू कसा निवडला जातो, त्याची प्रोसेस काय असते. याबाबत वृत्तवाहिनीवर सांगितले.