निवडणुकी तोंडावर बच्चू कडूंना जोरचा धक्का! प्रहारचा एकमेव आमदार शिंदे गटाच्या वाटेवर?

राज्यात होऊ घातलेली आगामी विधानसभा निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली आहे. मात्र अशातच प्रहार संघटनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रहार संघटनेचे एकमेव आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पुढील आठवड्यात राजकुमार पटेला यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं बोललं जात असून यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर बच्चू कडूंना हा सर्वात मोठा धक्का बसला.

एकीकडे विधानसभेला तिसऱ्या आघाडीची स्थापना करुन बच्चू कडूंनी महायुतीला आव्हान दिले असतानाच आता त्यांच्याच प्रहार संघटनेमध्ये मोठी फूट पडली आहे. प्रहार संघटनेचे एकमेव आमदार असलेले राजकुमार पटेल यांनी बच्चू कडूंची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकुमार पटेल हे अमरावतीच्या मेळघाट विधानसभेचे आमदार आहेत. येत्या १० ऑक्टोबरला धारणी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजकुमार पटेल यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.

दरम्यान, यावरुन बोलताना बच्चू कडू यांनी महायुती सरकारसह एकनाथ शिंदेंना मोठा इशारा दिला आहे. ही भाजप सेनेची खेळी आहे, बच्चू कडूला कसं कमी करता येईल म्हणून त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. त्याचा पहिला प्रयत्न राजकुमार पटेल यांना तिकीट देऊन प्रहार कमजोर करण्याचा प्रयत्न आहे पण ते होणार नाही, वीस वर्षात कोणत्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा न घेत आम्ही आव्हान पेलले, काही लोक निवडणुकीला घाबरतात पण आम्ही निवडणुकीला घाबरवतो. आम्हाला जो शिंदे गटाने तोडण्याचा प्रयत्न केला आहे,त्याला आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ,त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असं ते म्हणालेत.