सिकंदर शेख ठरला महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी

पुणे :  फुलगाव इथं सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना गतविजेता शिवराज राक्षे आणि सिकंदर शेख यांच्यामध्ये झाला. माती विभागातून संदीप मोटेचा पराभव करुन सिंकदर शेख अंतिम फेरीत दाखल झाला होता, तर तर गादी विभागातून हर्षद कोकाटेला धुळ चारत शिवराज राक्षेने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. या रोमहर्षक लढतीत सिकंदर शेखने शिवराज राक्षेला आस्मान दाखवत ६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब पटकावला आहे.