‘फोमो’ : एक आधुनिक आजार !

– माधुरी साकुळकर
साधारणत: विसेक वर्षांपूर्वी मानसिक आरोग्याचा फारसा विचार केला जात नव्हता. शारीरिक आजारासाठी ज्या तत्परतेने दवाखाना गाठत त्या तत्परतेने मानसिक आरोग्याची दखल घेतली जात नसे. अशा व्यक्तीला वेडा ठरवत. ‘देवीचा कोप आहे’ असे मानून त्याकडे फारसे लक्ष दिले जात नसे. तरीही फोबिया, कॉम्प्लेक्सेस, मॅनिया, सिंड्रोम  असे शब्द होते. त्यात आजकाल एका नवीन शब्दाची भर पडली आहे, तो म्हणजे फोमो. फियर ऑफ मिसिंग आऊट! fear of missing out फोबिया म्हणजे एखाद्या गोष्टीची विनाकारण वाटणारी भीती. ज्या भीतीला कुठलाही आधार नाही, जसे स्कूलफोबिया, एक्झामिनेशन फोबिया, फोटोफोबिया इत्यादी. काही जणांना एकटेपणाची भीती वाटते; त्याला ‘मोनोफोबिया’ असे म्हणतात. काही जणांना पाण्याची भीती वाटते; त्याला ‘हायड्रोफोबिया’ असे म्हणतात. fear of missing out मॅनिया म्हणजे एखाद्या गोष्टीच्या नको तितके मागे लागणे. एखाद्या गोष्टीसाठी पागल होणे. काहीही करून ती गोष्ट मिळविण्याचा प्रयत्न करणे. जसे आजकाल सर्रास बोलले जाते की, He is maniac for that.

मागे ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटानंतर मुली हृतिक रोशनसाठी पागल झाल्या होत्या. त्यांच्या दप्तरात हृतिक रोशनचे फोटो सापडत, त्याला ‘हृतिक मॅनिया’ म्हणत. कॉम्प्लेक्सेस तर अनेक प्रकारचे आहेत. fear of missing out सुपीरिरियॉरिटी कॉम्प्लेक्स, इन्फिरिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, इलेक्ट्रॉ कॉम्प्लेक्स, इडीपस कॉम्प्लेक्स इत्यादी कॉम्प्लेक्सेस् आहेत. त्याला ना जरा कॉम्प्लेक्स आहे qकवा मला ना त्यांच्यात मिसळताना जरा कॉम्प्लेक्सच येतो… अशी वाक्ये आपल्या सहजच कानावर पडतात. इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स म्हणजे मुलीला वडिलांबद्दल वाटणारे प्रेम व आकर्षण आणि इडिपस कॉम्प्लेक्स म्हणजे मुलाला आईबद्दल वाटणारं प्रेम व आकर्षण! यामुळे घराघरात आई-मुलाचं सख्य आणि मुलगी-वडिलांचं सख्य असं चित्र आढळतं. fear of missing out मुली वडिलांशी जास्त जोडलेल्या असतात तर मुले आईशी. हरीडवुमन सिंड्रोम, इम्पोस्टर सिंड्रोम, स्टॉकहोम सिंड्रोम हे सिंड्रोमचे काही प्रकार. स्टॉकहोम सिंड्रोम म्हणजे जो आपला छळ करतो त्याच्याच प्रेमात पडणे.
सध्या जो आजार धुमाकूळ घालतोय तो म्हणजे ‘फोमो.’ आपल्याला लोक विसरतील, आपण प्रवाहाच्या बाहेर फेकले जाऊ, आपली आयडेंटिटी लॉस होईल, या भीतीपोटी लोक काय काय करत असतात? fear of missing out सतत स्टेटस अपडेट करणे, डीपी बदलणे, आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट फेसबुकवर टाकणे, मी आज हे हे केले, मी आता इथे इथे आहे, मी आज आंघोळ केली नाही, आज माझं आणि माझ्या जोडीदाराचं भांडण झालं, माझं ब्रेकअप झालं, दुसरा बॉयफ्रेंड पहिल्यापेक्षा चांगला आहे इत्यादी इत्यादी. इतके सतत व्यक्त होणं कशासाठी? स्वतःचं इतके मार्केटिंग आणि प्रमोशन करायला आपण काय सेलिब्रिटी आहोत? आपलं वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर कशासाठी आणायचं? आजकाल लोक फार म्हणजे फारच व्यक्त व्हायला लागलेत. इकडे प्रायव्हसी, माझी स्पेस म्हणत स्वतःच्या आयुष्यात डोकवायला अगदी आई-वडिलांना आणि भावाबहिणींनाही मनाई करायची आणि तिकडे सगळं आयुष्य हे उघड्यावर मांडायचं, हा विरोधाभास, ढोंगीपणा म्हणायचा की सतत प्रकाशझोतात राहण्याचा अट्टाहास!
सतत मोबाईल हातात ठेवून व्हॉट्स अप बघणं, कुणाचं स्टेटस अपडेट झालं, कोण कुठे गेलं, कुणाच्या आयुष्यात काय घडतंय, हे बघणं म्हणजे इतरांच्या आयुष्यात नको तितके नाक खुपसणं नाही का? पण लोकांना नाक खूपसायला आवडतं आणि नाक खुपसू द्यायलाही आवडतं! जोपर्यंत सगळं नीट चाललं असतं तोपर्यंत प्रश्न नाही, पण जेव्हा गैरफायदा घेतला जातो, दुसèयाच्या व्यक्तिगत आयुष्यात नको तितकी ढवळाढवळ केली जाते, तेव्हा सायबर क्राईमचा जन्म होतो. सेक्सटॉर्शनचे प्रमाणही आजकाल वाढत चालले आहे. फेसबुक आणि व्हॉट्स अप वापरताना निरक्षीरविवेक असणे अत्यंत गरजेचे आहे. व्यक्त होण्यासाठी कितीतरी वेळ लोक फेसबुकवर असतात. वेळ वाया घालवतात. fear of missing out एका ठिकाणी तासन्तास बसून राहतात. आभासी दुनियेत रमतात आणि वास्तवापासून तुटतात. मागे सोनाली कुलकर्णीचं एक नाटक आलं होतं ‘व्हाईट लिली आणि नाइट रायडर’ नावाचं. त्यातल्या नायक-नायिकेला प्रत्यक्ष बोलताच येत नाही. ते कायम लॅपटॉपवरूनच एकमेकांशी बोलत असतात. याचा अनुभव आपल्यालाही कधी ना कधी येतच असतो.
आपली मुलं समोर असलेल्या नातेवाईकांशी बोलत नाहीत. काय बोलायचं हे त्यांना कळत नाही; पण फेसबुकवरून दूर असणा-या व्यक्तीशी बोलतात. सतत काहीतरी पोस्ट करायचं म्हणजे आयुष्यात सतत काहीतरी घडत राहिलं पाहिजे. आयुष्य कसं हॅपनिंग पाहिजे, मग प्रसिद्धी मिळविण्यासाठी वाट्टेल ते करायचं. सतत सेल्फी घेत सुटायचं. त्यासाठी डोंगरावर चढायचं, नदीच्या पाण्यात वाहून जायचं, असले प्रकार आढळतात. कुठेही आणि केव्हाही लोक सेल्फी काढतात आणि त्यासाठी तोंडाचा चंबू करण्यापासून तर झाडावर चढण्यापर्यंत, तर एका सेकंदात केसाचा बो सोडून झाडाला कवटाळण्यापर्यंत काहीही… अगदी काहीही करतात लोक. fear of missing out ‘फोमो’ हा मानसिक आजार आहे. त्यासाठी काही दिवसांनी काही लोकांना डी-एडिक्शन सेंटरला पाठवावं लागेल. आपल्याला कुणाचा तरी कॉल येईल म्हणून सतत मोबाईल हातातच असणे; अगदी आंघोळीला आणि वॉशरूमला गेलो तरीही. समजा एखादा फोन आला आणि तो घेतला गेला नाही तर आभाळ कोसळेल असे काही लोकांना वाटतं. एखादा प्रसिद्ध सर्जन आहे, पंतप्रधान आहे तर काही इमर्जन्सी आली तर सतत तयार असावे म्हणून त्यांनी मोबाईल मॅनिअ‍ॅक असावं हे ठीक; पण बाकीच्यांचं काय? fear of missing out इतका मोबाईल मॅनिया बरा नाही. समजा अशा व्यक्तींना दिवसभरात एकही कॉल आला नाही तर…? असे कसे लोक आपल्याला विसरले? आपण मेलो तर नाही ना? म्हणून खरेच मरतीलही…!
९८५०३६९२३३