अग्निकाष्ठ

-विद्या गोवर्धन
Organ Donation यावर्षी उन्हाळ्याच्या तीव्रतेने अंगाची लाहीलाही झाली. पाण्यात बसून राहावं की एसीतून निघूच नये, असे उद्गार गेल्या तीन-चार महिन्यांपासून आपण ऐकतोय. आपापसात यावर चर्चा सगळ्यांनीच केल्या. या विषयावरील पुरवलेली माहिती, ज्ञानात भर टाकणारे व्हॉट्स अ‍ॅपमधले मेसेजेस सुरूच होते. Organ Donation शेवटी अतिप्रतीक्षेनंतर एकदाचा पाऊस आला. उशिरा का होईना, पण त्याने आपला प्रामाणिकपणा सोडला नाही, असंच म्हणावं लागेल. पावसाची एक सर आल्याबरोबर मात्र सृष्टीने हिरवा शालू पांघरला. घरट्यात लपलेले पक्षी पंख पसरून आकाशात उडू लागले. लोकही समूहा-समूहाने वृक्षारोपण करण्यास धावले. वर्तमानपत्रात झालेली फोटोंची गर्दी बघून भविष्य उज्ज्वल असावं असं वाटलं. Organ Donation हल्ली मात्र निराशा होते आहे. प्रतिवर्ष वाढत जाणारं पृथ्वीचं तापमान संपूर्ण विश्वाचं बिघडलेलं हवामान, थंडी, पाऊस सगळ्यात आलेली अनियमितता बघून आपण खरंच जागरूक आहोत का? Organ Donation आपण खरंच प्रामाणिक आहोत का, यावर विचार करायला परिस्थितीने भाग पाडलं.

>वृक्षारोपण तर खूप होतेय; पण ते वृक्ष जगतात का, टिकतात का आणि सरकारी नीतीत त्यांना टिकू दिलं जातं का? बिघडलेल्या नव्हे, हाताबाहेर गेलेल्या या परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने पाच तरी वृक्ष लावले पाहिजे; नव्हे जगवले पाहिजे. Organ Donation नाहीतर तृतीय महायुद्ध पाण्यावरून होणार याचे पुरावे मिळताहेत. विकत मिळणारं बाटलीतलं पाणी व प्राणवायूचे सिलेंडर घेऊन वावरणारी भविष्यातील पिढी हे स्वप्न नव्हे सत्य आहे. आपल्या मुला-नातवांना फळं, फुलं बहुदा चित्रात पाहायला मिळणार म्हणून हळहळणारी पिढी या विपरीत परिस्थितीचा सामना करायला पुढे आली पाहिजे. केवळ पर्यावरण, खेळ, राजकारण यांच्या गप्पा तासन्तास ठोकूनही समस्या संपणारी नाही. Organ Donation आमच्या आईवडिलांनी लाड केले, गोडधोड खाऊ घातलं, नवीन कपडेलत्ते दिले. पण आपल्याला लागणा-या वस्तूंसाठी स्वत: संघर्ष करायला शिकवलं. एवढंच नव्हे, तर एकमेकांना सहाय्य करून घरापासूनच सामाजिकतेचे धडे शिकवले. आपल्याला पाय धुवायला, कपडे धुवायला, आंघोळीला लागणारं पाणी विहिरीवरून आणताना आपोआपच ते विचारपूर्वक वापरलं जाऊ लागलं. पूर्वी या खोलीतून त्या खोलीत जाताना जबाबदारीने दिवा विझवला नाही तर शिक्षा होत असे. Organ Donation कुठे होते व्हॉट्स अ‍ॅप महाराज, कुठे होते एवढे ज्ञानी लोक?

जगण्याच्या पद्धतीतून संस्कारांच्या शिक्षणाने नकळत पिढी अत्यंत जागरूक, जबाबदार, सुसंस्कृत, सुशिक्षित झाली. आताही काही लोक आपल्या विचारांवर अटळ आहेत. Organ Donation पण जागेची कमी, पाण्याची कमी, वेळेची कमी व सरकारी अविचारी नीतीने आलेल्या उदासीनतेने ‘हे काम माझं नाहीच; कोणीतरी करतंय नं, करू दे आणि काय, नावासाठी तर करताहेत. मी का करू? मी उच्च शिक्षणाने आज सगळंच विकत घेऊ शकतो. मी काय हेच बघत बसू’ अशी भावना झाल्याने दहा बंगले, पाच गाड्या घराच्या बगीच्यासाठी लॉन व गाड्यांसाठी धो-धो वाहणारं पाणी, तासन्तास जळणारी मोटर हे आमच्या वैभवाचं प्रतीक आम्ही मानतो खरं नं? सगळं जग सुखी झालं तरच तू सुखी होशील, हे निर्विवाद सत्य प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं. तासन्तास पोराला वाळूतून फरपटत हंड्यावर हंडे घेऊन मैलोन्मैल चालणा-या त्या अगतिक स्त्रिया या माझ्या आईबहिणी आहेत. Organ Donation या चित्राला पहिलं बक्षीस मिळवून देण्यात इतिकर्तव्यता न मानता, त्यांच्या हंड्यात निदान उदरनिर्वाहापुरतं पाणी कसं येईल, याचा विचार प्रत्येकाला करायला हवा. प्रयत्न प्रामाणिक करायला हवा.

स्वत:ला सांगा जगाला नको सांगायला. Organ Donation हवं तर मी पाणी आवश्यकतेपेक्षा जास्त वापरत नाही. किती जण पावसाच्या पाण्याचा संचय करतात? किती लोक, किती संस्था वॉटर हॉर्वेस्टिंग व सोलरचा उपयोग करतात? किती लोक प्लॅस्टिक व अन्य वस्तू न वापरण्याचा, प्राणिमात्रांना नद्या-विहिरींना प्रदूषणापासून वाचवण्याचा प्रयत्न करतात. किती जण आमच्या जुन्या पिढीचा आदर करतात? ‘ही म्हातारी माणसं ना नुसतं ज्ञान पाजळत असतात. तुम्हाला मिळतंय नं, मग चूपचाप बसा म्हणावं,’ असे उद्गारही सर्रास ऐकायला मिळतात. आम्ही पण जन्मलो तेव्हा हे ज्ञान घेऊनच जन्माला नाही आलो हो. Organ Donation आम्हाला आठवतं, आम्हाला कळू लागल्यापासून आमचे वडील म्हणायचे मी देहदान, नेत्रदान करणार. या आधुनिक विचारांना समाज पटकन मान्यता देत नाही. पण वडील सांगत, मानवाने स्वत:त चांगलं जगणं गृहीतच आहे तरच तो इतरांनाही मदत करू शकतो, हे निर्विवाद सत्य आहे.

Organ Donation पण त्याने जीवनात एका वृक्षाला आपला गुरू मानावं आणि आपण त्याला गुरू मानून गुरुदक्षिणा द्यावी. झालं; इतकं सूत्र जर जीवनात सांभाळलं ना, तर इतर पूजापाठ करण्याची पण खूप आवश्यकता नाही. खरंच एक व्यक्ती, परिवाराने ठरवलं तर समाजाला काय काय देऊ शकते. ठरवल्याप्रमाणे देहदान केलं म्हणण्यापेक्षा त्यांच्या सांगण्यातले गांभीर्य जाणून कुटुंबाने त्यांची इच्छा पूर्ण केली. म्हणूनच लोकही वृक्ष लावा, फक्त लावूच नका; आपल्या मुलांसारखं त्यांचं संगोपन करा. तुमचा हा प्रामाणिक प्रयत्न उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार आहे. Organ Donation वृक्ष लावून तो जोपासणं ही वरवर सामान्य घटना वाटली तरी त्यात दडलेली सामाजिकता, जागवा चातुर्मासात फक्त देवळांच्या गाभा-यातील घंटानाद करून आपलं कर्तव्य पूर्ण होत नाही. मानवतेचा हा जागर प्रत्येकाच्या घराघरात समाजात व राष्ट्रात जागवा. देहदान करा…! देहदान करा…!
९०३९२ १६५५०