नगीनाभाभी एकदम गोरक्षणापर्यंत कशी पोहोचली?

गोरक्षक, समाजसुधारक नगीना अन्वर खान. वय वर्षे ४१, खानदानी काश्मिरी सौंदर्य, सात्विक साधेपणा, पाच मुलांची आई, गृहिणी. आज तीन-चार वर्षांनी भेटलो होतो. महिला सक्षमीकरणाचे काम करणारी नगीनाभाभी एकदम गोरक्षणापर्यंत कशी पोहोचली? मी तिच्याशी बोलता-बोलता तिची मुलाखतच घेऊन टाकली. त्याचेच केलेले हे शब्दचित्रण’‘मेरे बीस बछडे देखते देखते गुजर गये…मर गये… मै कुछ ना कर सकी…” बारामुल्लाची नगीनाभाभी हमसून-हमसून रडत होती आणि मला सांगत होती. स्वतःच्या गोशाळेमधील प्रेमाने पोटच्या पोरांप्रमाणे वाढवलेल्या २० वासरांचा डायरियामुळे दोन दिवसांत मृत्यू झाला; ते सांगताना तिला पोटच्या पोरांना गमावल्यासारखे दुःख होत होते.

मलाही माझे अश्रू आवरता आले नाहीत. बारामुल्लासारख्या ठिकाणी रा. स्व. संघ विचारांनी प्रेरित झालेली नगीना खान आणि तिचे कुटुंब गोशाळा चालवतात. ४० गायी आणि त्यांना झालेली वासरे यांची जबाबदारी तिने गेल्या चार वर्षांपासून स्वतःच्या जीवावर पेलली होती. आता फक्त १९ राहिल्या आहेत.नगीना अन्वर खान अशी माणसे भेटली की, आपले खुजेपण अधोरेखित होते. आपण इतक्या अनुकूल परिस्थितीमध्ये मनासारख्या गोष्टी करत असतो. आपल्या कामाची वाहवासुद्धा होत असते. तिला जे भावले, तिला जे पटले आणि या राष्ट्रासाठी जे आवश्यक आहे, असे वाटते तेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ती जिद्दीने करते आहे. तशी तर नगीनाभाभींची माझी ओळख अलीकडचीच. श्रीनगरमध्ये २०१४ साली पूर आला होता, तेव्हा पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन मी श्रीनगरला पोहोचले. पूर्ण श्रीनगर पाण्याखाली होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस दि. १७ सप्टेंबर. त्याचे निमित्त साधून एक ट्रकभर सामान आणि डॉक्टरांचे पथक घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यासाठी मी तिथे पोहोचले होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जे बचावकार्य चालू होते, त्यांच्यामार्फत मला एक नंबर मिळाला.

त्या व्यक्तीचे नाव होते मोहम्मद अन्वर खान, पीक्स ऑटो. त्यांची काश्मीरमध्ये मारुतीची सर्व्हिस सेंटर्स होती. माझी राहण्याची व्यवस्था; पण त्यांच्याकडेच होती. मी जेव्हा त्यांच्याकडे पोहोचले, तेव्हा नगीनाभाभी हातात झाडू घेऊन ग्राऊंड फ्लोअरवरचा चिखल काढत होत्या. त्यानंतर आमची जीवाभावाची मैत्री झाली, ती आजतागायत. आज मी त्यांच्या मुलीच्या लग्नाला निकाहसाठी म्हणून तिच्या घरी आले होते आणि ती मनातले दुःख माझ्या समोर हलके करत होती. गोरक्षक, समाजसुधारक नगीना अन्वर खान, वय वर्षे ४१, खानदानी काश्मिरी सौंदर्य, सात्विक साधेपणा, पाच मुलांची आई, गृहिणी. आज तीन-चार वर्षांनी भेटलो होतो. महिला सक्षमीकरणाचे काम करणारी नगीनाभाभी एकदम गोरक्षणापर्यंत कशी पोहोचली?मी तिच्याशी बोलता-बोलता तिची मुलाखतच घेऊन टाकली. तुम्हाला हे गोरक्षणाचे कुठून सूचले? नगीनाभाभी म्हणाल्या, “मॅडम, (ती मला मॅडम म्हणते, मी तिला अनेकदा सांगितलं की, भाभी, ये आप मुझे मॅडम मत बुलाया करो मेधा भाभी या सिर्फ मेधा बोलेंगे तो अच्छा रहेगा. पण, ती ऐकत नाही) हे सगळे

तुमच्यामुळे, आपल्याच प्रेरणेने झालेले आहे. आपण भेटण्याच्या आधी माझ्या मनात समाजसेवा करण्याची काहीच माहिती नव्हती. पण, अडल्यानडल्यांना मदत करण्याची उर्मी तर माझ्या लहानपणापासूनच होती आणि जेवढे जमेल तेवढे मी करतच असे. आमच्या शेजारीच यतीमखाना होता, म्हणजे अनाथाश्रम आहे. याच्या यतीमखान्यातल्या, अनाथाश्रमातल्या सर्व मुलांना मी माझ्या घरी जेवायला बोलवत असे. काही प्रसंगी, वेळेला त्यांच्याकडे मी जेवणही नेऊन देत असे. त्यांच्या शाळेची फी असेल किंवा कपडे लागत असतील, त्यांना गरज असेल, त्याप्रमाणे मी त्यांना देण्याचा प्रयत्न करत असे. जर का मला जमले नाही, तर मी इतर कोणाच्या तरी माध्यमातून ते देण्याचा प्रयत्न असे जेव्हा इथे पूर आला, त्या वेळेला ती सर्व मुले माझ्या घरीच माझ्या मुलांबरोबर तीन दिवस राहिली होती आणि होडी मिळाल्यावर, सर्वप्रथम त्या मुलांना सुरक्षित जागी पोहोचवले; नंतरच आम्ही इथून सुटलो. त्यामुळे मला आणि माझ्या मुलांना त्याचप्रमाणे माझ्या पतीलासुद्धा समाजसेवेची खूपच आवड होती आणि आम्ही ती आमची सामाजिक बांधिलकी म्हणूनच करत होतो. त्यातच आम्हाला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख झाली.

जर का समाजामध्ये, आपल्या काश्मीर खोर्‍यातील या लोकांची परिस्थिती सुधारायची असेल, उन्नती करायची असेल, तर शांतता प्रस्थापित करणे गरजेचे आहे, हे तेव्हा जाणवलं. त्याच वेळेला ती शांतता अटलबिहारी वाजपेयी यांच्या वेळी मिळाली. नंतर मोदीजी देतील, याच विचाराने आम्ही प्रेरित झालो होतो आणि त्या विचारानेच आम्ही काम करत होतो. याच्या मधूनच आम्हाला एक प्रेरणा मिळाली की, आपण भाजपचे काम करायचे. “मॅडम, मी तुम्हाला सांगते, तुम्ही मला भेटला तो तर माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवशाली क्षण होता. कारण, मला त्यामुळे एक हौसला मिळाला मला असे वाटायला लागले की, माझे आयुष्य विस्तारले आहे. माझे क्षितिज विस्तारले आहे. त्यापूर्वी मी फक्त-मी स्वतः, पती आणि माझी मुले यापर्यंतच माझे आयुष्य मर्यादित होते; इथे आईच्या पोटात असल्यापासूनच आमची इतिकर्तव्यता हीच असते की, जन्माला येणे, मुलांना जन्माला घालणे, त्यांना मोठे करणे आणि मरून जाणे. परंतु, तुम्ही भेटल्यानंतर मला असे जाणवले की, याच्या पलीकडे आपल्याला करण्यासारखे खूप आहे आणि तुम्ही मला ही प्रेरणा दिली, आत्मविश्वास दिला. मला शिकवले की, नगीना ठरवले तर तुम्ही काहीही करू शकता. तुमच्यामध्ये करण्याची क्षमता आहे. मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी जर का पहिली स्त्री कोणी असेल, तर ती तुम्ही होतात मॅडम!” नगीनाभाभींच्या डोळ्यांमधल्या अश्रूला खळ नव्हती. मी म्हणाले की, “तसं काही नसतं बरं का! परंतु, प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणत्या तरी एका घटनेचा ‘ट्रिगर’ मिळाला पाहिजे आणि तो ‘पॉईंट’ देवाच्या कृपेने तुमच्यासाठी मी होते. नंतर त्यांच्या आयुष्याला वेगळीच दिशा मिळाली. त्यांनी खूप-खूप म्हणजे खूपच समाजसेवा केली.