मोहम्मद रफी यांनी भारतीय संगीताला स्वरांनी भिजवले

अमृतसरजवळ असलेल्या कोटला (पंजाब) येथे मोहम्मद रफी या महान गायकाचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या वर्षीच एका फकिराचे गाणे ऐकताना तल्लीन झालेल्या ह्या मुलाने मग गाण्याचाच ध्यास घेतला. परंपरागत न्हाव्याचे दुकान न चालवता आपला ‘गळा’ चालवायचं ठरवलं, हे आपलं भाग्य. वडिलांच्या विरोधाला तोंड देत देत त्याने आपल्या परीने गाण्याचा रियाज सुरू ठेवला.

नंतर मात्र नशिबाने त्याला ‘बरकत अलीखान’ या महान शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायकाचं मार्गदर्शन लाभलं.’लाहोर’मध्ये सैगल साहेबांच्या एका जाहीर कार्यक्रमाला त्यांचा हा लहान चाहता हजेरी काय लावतो, तिथली पुन्नी जी जबदिय होते आणि म्हणत, ह्या लहानग्याला गायला उभं केलं जातं. तिथे तो गातो आणि खुद्द जन्मशताब्दी वर्ष शेषसैगलजी त्याच्या गाण्याचं कौतुक करतात. हे सर्व होताना पाहून या १३ वर्षाच्या मुलाला सोबत करायला म्हणून आलेला, ‘हमीद’ हा त्याचा मोठा भाऊ प्रभावित काय होतो आणि मग तो युष्यभर रफीजींच्या पाठीशी काय उभा राहतो. श्यामसुंदर त्यांच्या ‘गुल बलोच’ या पंजाबी चित्रपटात गाण्यासाठी म ोहम्मदला पाचारण काय करतात आणि त्यानंतर मोठे बंधू, हमीदभाई त्याला घेऊन मुंबईकडे काय प्रयाण करतात. तिथे १९४१च्या ‘प्रेमनगर’ चित्रपटाम ळे चर्चेत आलेले आणि मग ‘रतन मधल्या अप्रतिम गाण्यांनी प्रसिद्धीच्या झोतात आलेले, नौशादजी रफी यांना संधी देतात. मुंबईतल्या अतिशय गजबजलेल्या अशा भेंडीबाजार ह्या परिसरात एक लहानशा खोलीत हम ीद आणि मोहम्मद राहतात आणि मग हळूहळू करत सुरू होतं ‘रफी युग’.

सर्वांच्यात रफी आपला स्वतःचा ठसा उमटवू पाहात होते. तो काळ सैगल स्वरांनी भारलेला होता. येणारा प्रत्येक नवीन गायक सैगल यांचा आदर्श समोर ठेऊन गात होता आणि ह्या छोठ्या रफीचं तर सैगल साहेबांबरोबर गाण्याचं स्वप्न होतं. १९४६ मध्ये शहाजहाँ ह्या चित्रपटासाठी संगीतकार नौशाद ह्यांनी, दिग्गज सैगलबरोबर एक गाणं गाण्याची संधी मोहम्मद रफीला दिली आणि रफी-सैगल गायले, ‘मेरे सपनों की रानी, रुही रुही रुही’. अगदी दोन ओळीच तेसुद्धा गाण्याच्या शेवटी शेवटी रफी गायले.नौशाद यांच्याच संगीतात, त्यांना अनमोल घड़ीसाठी एक एकलसुद्धा गायला मिळालं, ‘तेरा खिलौना टूटा बालक’ जे बयापैकी गाजलं. जुगनूमध्ये एक एकल आणि एक गाणं मिळालं, दिग्गज नुरजहाँबरोबर, ते गायले, ‘यहाँ बदला वफा का’ (संगीत- फिरोझ निजामी) साजनसाठी रफीजी तब्बल सहा गाणी गायले चार द्वंद्व आणि दोन एकल (सी. रामचंद्र) त्यातलं ‘तुम हमारे हो न हो. तुम्हारा ही आसरा’ (गीतकार मोती) हे गाणं एकल आणि ललिता देऊळकर यांच्यासोबत गायलेलं द्वंद्वगीत अशी दोन्ही गाणी गाजली. एक गाणं रफीसाहेबांबरोबर लताजी गायत्या. जे बहुदा त्यांचं पहिलं युगुल गीत असावं.

चित्रपट ‘शादी से पहले’ संगीतकार कोणी पैगणकर, कर्नाड होते आणि गाणं होतं, ‘चलो हो गई तैय्यार, जरा ठहरो जी. खरोखरच हे दोघे सुवर्णयुग आणण्यासाठी ‘तय्यार’ होते. येणाऱ्या २० वर्षांत सुमधूर गाण्यांची ‘बरसात’ हे दोघे, आपल्या बाकी साथीदारांच्या साथीने करणार होते.खरं तर त्या नंतरची अनेक अनेक वर्ष ह्या दोघांनी तरी खूप गाजवली. सुवर्णकाळ आला आणि संपला पण ह्या दोघांचा सुमधूर गायनाचा प्रवास सुरूच राहिला. ३१ जुलै १९८० मध्ये हृदयविकारामुळे रफीसूर हरपला व लताजी काहीशा एकट्या पडल्या. पण ह्या त्यांच्या दोघांच्या प्रवासाची सुरुवात झाली ती ह्या गाण्याने, जे आलं होतं १९४७मध्ये. रफी भारतीय संगीताला आपल्या स्वरांनी भिजवत राहिले. १९४८नंतर त्यांचे सूर भारताच्या कानाकोपऱ्यात ऐकू येऊ लागले आणि बघताबघता ते आघाडीचे गायक झाले.

– नितीन बापट, जळगाव
९२२५७ १२९५४