येस्स… कर्मा कॉलिंग

मुंबई:  जब दुनिया कदमों में हो, तो कर्मा कुछ नहीं बिगाड सकता, असा काहीसा दमदार संवाद रविना टंडनच्या ‘कर्मा कॉलिंग’ या वेब सीरिजमध्ये ऐकायला मिळणार आहे. उच्चभ्रू समाजाचा चेहरा उघडा पाडणाऱ्या मालिकेत रवीना ही इंद्राणी कोठारी अशी व्यक्तिरेखा साकारणार आहे. कर्मा कॉलिंगची कथा कोठारी कुटुंबाची असून,

यात षड्यंत्र, सूड, फसवणूक, विश्वासघात अशा विविध पैलूंभोवती फिरते. श्रीमंतांच्या जगाची आकर्षक झलक यात पाहावयास मिळेल. अतिशय मनोरंजक सीरिज असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. ग्लिट्ज, ग्लॅमर, फसवणूक आणि विश्वासघाताची ही कथा रुचि नरेन यांनी दिग्दर्शित केली आहे. ओटीटी प्लॅटफफॉर्म डिस्ने प्लस हॉट स्टारवर २६ जानेवारीरोजीपासून पाहता येणार आहे. विशेष म्हणजे, ही कृती २०११-२०१५ दरम्यान प्रसारित झालेल्या अमेरिकन सीरिज रिव्हेंजवर आधारित आहे.