---Advertisement---
Muktainagar News: महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना राज्यभर गाजत असतांना जळगावमध्ये ही एक घटना समोर आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार करून तिचा आक्षेपार्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संतापाची लाट उसळी असून या प्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध अत्याचार, पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय
मिळालेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हरताळा शेत शिवारात आरोपी ईश्वर सिद्धार्थ वाघ (रा. मुक्ताईनगर, ह.मु. पुणे) याने पीडित मुलीला गाठून तिला जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढ्यावरच न थांबता या नराधमाने पीडितेचा आक्षेपार्य व्हिडिओ देखील तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे. या घटनेने पीडितांचे कुटुंबीय प्रचंड घाबरले असून त्यांना धक्का बसला आहे.
दरम्यान नराधमाने ६ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आपल्या ‘ इन्स्टाग्राम आयडीवरून पीडितेचा अश्लील व्हिडिओ टाकून तो व्हायरल केला. या प्रकाराने पीडितेच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. अखेर पीडित मुलीने धीर धरून हिम्मत दाखवून पोलिसात तक्रार दिली. तिच्या फिर्यादीवरून ७ मे रोजी रात्री उशिरा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात सदर नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. सपोनि राजेंद्र चाटे व पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान आरोपी फरार आल्याचे सूत्रांनी सांगितले.









