---Advertisement---

अंगणवाडीच्या पोषण आहारात मृत पाल आढळून आल्याने खळबळ

---Advertisement---

जळगाव । अंगणवाडी मार्फत देण्यात येणाऱ्या पोषण आहारात मृत पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथे समोर आला आहे.  प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पुरवठा दाराची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथे अंगणवाडी मार्फत प्रत्येक महिन्याला पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. हे धान्य अंगणवाडी सेवीकांच्या मार्फत गरोदर माता आणि बंळतीण महिलांना देण्यात येते. राज्या शासनाकडून ही योजना जिल्हापरिषदे मार्फत कंत्राटीपद्धतीने राबवण्यात येते. दरम्यान जळगावात देण्यात येणाऱ्या सिल बंद शालेय पोषण आहारात मृत पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी संबंधित लाभार्थ्यांने जिल्हा परिषद व अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाने हरभरा व मुगाच्या डाळीचे नमुने घेतले आहेत. ते तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तर जिल्हा परिषदेच्यावतीने ही या प्रकरणी पुरवठा दाराची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी दिली आहे.

अनेकदा अंगणावाडीमध्ये पुरविण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा खूप निकृष्ट असतो. धान्य सडलेले तसेच बहुतेक वेळा यांना अळ्या देखील लागलेल्या असतात. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करून देखील संबंधित पुरवठा दारांवर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. प्रशासनातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होऊन देखील त्याचा काहीही परिणाम या पुरवठा दारांवर होत नसल्याचे समोर आले आहे.

मात्र, आता थेट सिल बंद पाकिटात मृत पाल सापडली आहे. हा खूप संतापजनक प्रकार असून गरोदर माता आणि तिच्या बाळाच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून या संदर्भात कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. पाकिटांमध्ये धान्य भरताना ही मृत पाल दिसली नाही का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment