नागरिकांनो, अंतराळातून पृथ्वीवर येणार आज खास गिफ्ट

तरुण भारत लाईव्ह । २३ सप्टेंबर २०२३। अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे असोसिस रेक्स अंतराळ पृथ्वीवर आज एक अद्भुत गिफ्ट पाठवणार आहे. पृथ्वीवर बेन्नु या लघुग्रहाचे नमुने असलेले कॅप्सूल पाठवले जाईल. शास्त्रज्ञ या गिफ्ट ची वाट पाहत आहेत.

पृथ्वीवर येणारा हा पहिला मोठा लघुग्रह नमुना २०१६ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. हे यान स्वतः पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार नाही तर कॅप्सूल ला पूर्व निर्धारित स्थानावर अचूक मार्गाने ड्रॉप करेल. कॅप्सूलचे योग्य वेगाने उतरणे आवश्यक आहे. ड्रॉपच्या वेळी कॅप्सूल खूप उंच कोनात असल्यास नमुने बाह्य अवकाशात उतरतील जेथून ते पूर्ण प्राप्त केले जाऊ शकत नाही.

दुसरीकडे जर कॅप्सूल खूप कमी कोनात असेल तर ते ग्रहाच्या वातावरणात जळून जाईल. या मोहिमेचे संपूर्ण नाव ओरिजिनस स्पेक्टरल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटिफिकेशन आहे मोहिमेतील नमुने महत्त्वाचे आहेत. कारण बेन्नु सारखे लघुग्रह टाईम कॅप्सूल म्हणून काम करू शकतात. नमुने शास्त्रज्ञांना सूर्यमालेची उत्पत्ती आणि उत्क्रांती बद्दल अधिक माहिती मिळवण्यात तसेच लघुग्रहांच्या निर्मिती बद्दलचा अभ्यास वाढवण्यास मदत करू शकतात.

भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री आठ वाजून २५ मिनिटांनी उटाह मधील एका वाळवंटाचे कॅप्सूल उतरण्याची शक्यता आहे. या सुमारे २५० ग्रॅम सामग्री आहे जी सुमारे दोन वर्षांपूर्वी असोरीस रेक्सने बेन्नु लघुग्रहावरून गोळा केली होती. १३ मिनटात ते पृथ्वीवर पोहोचेल. नासाचे युट्युब चॅनेल व सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रिम करेल.