जळगाव : अफूची बोडे व चुरा (आमली पदार्थ)ची वाहतूक करणाऱ्या वाहनावर चाळीसगाव पोलीसांनी कारवाई केली आहे. यात तब्बल २८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चाळीसगाव शहरातील कोतकर महाविद्यालयाजवळून अफूची बोंडे व चुरा यांची क्रेटा कार क्रमांक (एमपी ०९ डब्ल्यूसी १४८५) मधून वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती चाळीसगाव शहर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी कारवाई करण्याच्यासुचना दिल्या. पोलीसांनी रविवारी ८ ऑक्टोबर रोज पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास महाविद्यालयासमोर सापळा रचला. वाहतूक करणारी कार पोलीसांनी अडविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान पोलीसांनी कारचा पाठलाग केला. चाळीसगाव रेल्वे स्थानकजवळ कारला लॉक लावून कार चालक पसार झाला. दरम्यान पोलीसांनी तपासणी केली असता त्यात अफूची बोंडे व चुरा आढळून आला. जवळपासून १२ लाख रूपये किंमतीचा १ क्विंटल ८० किलो २४० ग्रॅम अफू मिळून आला. याप्रकरणी पोहेकॉ राहूल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या आदेशान्वये चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सागर ढिकले, पोउनि सुहास आव्हाड, पोउनि योगेश माळी, चालक पोहेकॉ नितीन वाल्हे, पोहेकॉ राहुल सोनवणे, विनोद भोई, सुभाष घोडेस्वार, पंढरीनाथ पवार, पोना महेंद्र पाटील, भुषण पाटील, तुकाराम चव्हाण, दिपक पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, विजय पाटील, पवन पाटील, आशुतोष सोनवणे, समाधान पाटील, रविंद्र बच्छे, राकेश महाजन, ज्ञानेश्वर गिते, विनोद खैरनार, निलेश पाटील, शरद पाटील, प्रविण जाधव, संदीप पाटील यांनी ही कारवाई केली.