अडावद ता.चोपडा : अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलशाचे अडावद शहरात मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी या अक्षदा कलशाची श्री राम यांच्या भव्य प्रतिमेसह गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आबालवृध्दासह हजारो नागरिकांनी या मिरवणूकीत सहभाग घेतला. यावेळी प्रभूश्री रामचंद्रांच्या जयघोषाने अवघे अडावद शहर दुमदुमले.
येथील संयुक्त राम मंदिर तथा शनि मंदीरात अक्षदा कलशाचे विधवत पूजन करुन मुख्य मिरवणूकीस प्रारंभ झाला. यावेळी ट्रॅक्टरवर अक्षदा कलशासह प्रभू श्री रामाची भव्य प्रतिमा लावण्यात आली होती. ढोल-ताशे, बँड, घोडे तसेच लेझिम पथकांनी मिरवणुकीची शोभा वाढविली. कलश धारी चिमकुल्या कुमारीका, सुवासिनी, महिला यांच्या लक्षणीय सहभागाने परिसरात उत्साह संचारला होता. यात ओम शांती केंद्रातर्फे राम, लक्ष्मण, सितामाई, हनुमानजी यांचा सजिव देखावा साकारला होता. ढोल-ताशा, बँडच्या तालावर आबालवृध्दांनी ठेका धरत श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या भव्य दिव्य समारंभाची रंगीत तालीम करुन घेतली.
यावेळी शांताराम पाटील, चंद्रशेखर पाटील, एम.के शेटे, लोकेश काबरे, प्रविण कोठारी, हनुमंत महाजन, डाॅ. सुभाष कासट, सचिन महाजन, सुनिल सारस्वत, गोविंद सैंदाणे, राकेश पाटील, उमेश कासट, प्रेमराज पवार, भुषण पंचोली, अनिल देशमुख, पंकज महाजन, कमलेश चौधरी, सुरेश बाहेती, शशिकांत कानडे, जगदिश सोळंके, मोहन माळी, पी.डी.महाजन, भुषण राजपुत यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,
मिरवणूक ग्रामपंचायत मार्गे, चांग्यानिंब चौक, सुभाष चौक, गोळली विहिर चौक, जागेश्वर पतसंस्थेपासुन शिंपी गल्लीमार्गे मधुकर कासार यांच्या दुकानापासुन शंभू भवानी चौक, नेहरु चौक मार्गे इंदिरा नगरात या शोभायात्रेची सांगता होईल. रात्री उशिरा पर्यत मिरवणुक सुरु होती. यावेळी पोउनि चंद्रकांत पाटील यांच्यासह पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.