अखेर प्रतिक्षा संपली! महाराष्ट्र बोर्डाच्या 12वीचा निकाला उद्या लागणार

महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी अत्यंत मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली असून त्यानुसार उद्या म्हणजेच 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे निकालाची वाट सतत पाहत होते. काही दिवसांपूर्वीच बोर्डाकडून हे स्पष्ट करण्यात आले की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल. त्यानंतर आता नुकताच बोर्डाकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. आता विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा ही संपलीये. आता विद्यार्थी बारावीचा निकाल उद्या म्हणजे 21 मेला पाहू शकणार आहे. यानंतर आता लवकरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाबद्दलची देखील मोठी घोषणा केली जाऊ शकते. बोर्डाकडून अगोदरच हे स्पष्ट करण्यात आलंय की, दहावीचा निकाल मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल.

12वीचा निकाल येथे पाहता येणार?
१. mahresult.nic.in
२. http://hscresult.mkcl.org
३. www.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. http://results.targetpublications.org